प्रतिष्ठा न्यूज

शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट संघामध्ये विलिंग्डनच्या सृष्टी शिवांगी ची निवड

प्रतिष्ठा / न्यूज योगेश रोकडे 
सांगली : शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय  स्पर्धा महावीर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. सदर  स्पर्धेमधून शिवाजी विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये विलिंग्डन महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी शिवांगी बी.एस.सी. भाग 3 हिची निवड करण्यात आली. या स्पर्धा अवधेश प्रताप सिंग विद्यापीठ रेवा मध्यप्रदेश येथे होणार आहेत. पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाल्याबद्दल सृष्टीचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.सुरेश कुंभार, उपप्राचार्य जी.डी.शेळके, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. राजू कांगणे, डॉ.मनोहर कोरे,प्रा. मुंडगनूर, रजिस्टर हनुमंत उपळावीकर उपस्थित होते. त्यांना सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे ,सदस्य रवींद्र ब्रम्हनाळकर , आजीव सदस्य उपप्राचार्य डॉ.आर. ए. कुलकर्णी, प्रा.आर.जे.पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने, क्रीडाशिक्षक योगिता परमने, अशोक आंबोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.