प्रतिष्ठा न्यूज

तासगाव भाजीपाला विक्रेत्यांचें नगरपालिकेला निवेदन… प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: आज तासगाव शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते यांनी जनसेवा भाजीपाला विक्री संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष शंभूराजे काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव नगरपालिका प्रशासनास जुन्याच जागेवर बसण्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा यासाठी निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की
आम्ही शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते गेली ४० वर्षांपासून विटा नाका बागवान चौक ते बागणे चौक दरम्यान दररोज भाजी पाला विक्री करीत आहोत,शहरातील आठवडयाचे दोन बाजार सुध्दा याच ठिकाणी करत होतो व आहेत.परंतु नगरपरिषदेने आता या ठिकाणी विक्री करणेस व व्यापार करणेस आम्हास मनाई केलेली आहे.नगर परिषदेने जे भाजीपाला मार्केट बांधले आहे,ते बांधताना भाजीपाला विक्रेत्यांचा विचार केला गेला नाही,तर फक्त पैसा मिळवणेचा दृष्टीकोण नजरेसमोर ठेवून सदरचे बांधकाम केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणचा बाजार हा पुर्णतः दडगा व बंदीस्त आहे.त्यामुळे त्या ठिकाणी व्यापार होत नाही.आता आम्ही बसतोय त्या ठिकाणी आमच्या कांही चुका आहेत त्या आम्ही नाकारात नाही परंतु असा चुकीचा घेतलेला निर्णय तासगांव शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना भिकेला लावणार आहे.आज आम्ही आमची भाजी पाला विक्रेता संघटना नोंदणीकृत करत आहोत,तसेच इथुन पुढच्या काळात नगरपरिषदेला पूर्ण सहकार्यांची आम्ही हमी देत आहोत.
आम्ही ज्या ठिकाणी व्यापार करत आहोत.तो वर वर्णन केलेला रस्ता कोणत्याही प्रकराच्या वाहतूकीचा नाही तर येणाऱ्या जाणान्या ग्राहकांना सुध्दा कोणत्याही वाहतुकीचा रोड मार्ग ओलांडावा लागत नाही,तरी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुन्हा पूर्ववत जुन्या बाजारपेठेत भाजीपाला विक्रीस परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे.यावर प्रशासन काय निर्णय देणार याकडे संपूर्ण तासगाव शहराचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.