प्रतिष्ठा न्यूज

तासगावात सलग दुसऱ्यांदा बदलीचा आंनदोत्सव… रुजू झालेल्या तहसीलदारांकडून लोकहिताच्या कामाची अपेक्षा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : अनेक प्रशासकीय अधिकारी पदाला न्याय देऊन,सर्वसामान्य गरीब लोकांची, शेतकऱ्यांची,वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी कामे करून, वंचितांना केंद्रबिंदू मानून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहेत. कार्यालयामध्ये पारदर्शकता,भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व गतिमान व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच,तालुक्याच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावून प्रशासनाची मान उंचावन्याच कामं देखील करत आहेत,अशा अधिकाऱ्यांची बदली होऊ नये यासाठी सामान्य लोकांनं कडून उपोषण,आंदोलन केली जात असताना तासगाव तालुक्यात मात्र तहसीलदारांची बदली झाल्यानंतर सलग दुसऱ्यांदा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.मागील तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या बदलीनंतर तासगावातील नागरिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला होता,आताही रवींद्र रांजणे यांच्या बदलीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोस्तव साजरा केला.त्यामुळे तासगाव येथे नवीन रुजू झालेले तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सामान्य लोकांच्या हितास प्राधान्य देऊन चांगल्या कामकाजाची अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहेत.तालुक्याचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांची बदली पुणे प्राधिकरण येथे झाली आहे. नवीन तहसीलदार अतुल पाटोळे हे या ठिकाणी रुजू झाले आहेत. तहसीलदार असताना रांजणे यांनी केलेल्या पक्षपाती कामकाजाचा निषेध म्हणून त्यांची बदली झाल्यानंतर आज तहसीलदारांचे निरोप समारंभाच्या वेळी भाजपा पंचायत राज आघाडीने तहसील कचेरीसमोर फटाके फोडून आनंदोस्तव साजरा केला.तहसीलदार असताना तीन वर्षाच्या काळात रांजणे यांनी सामान्यांची कोणतीही दखल घेतली नाही,काम करताना पक्षपातीपणा राबवला,रेशन विभागातील कामासाठी सामान्य लोकांना हेलपाटे मारावे लागले,वाळू, मुरूम तसेच गौण खनिज या माफीयांना अभय देण्याचे काम केले, शेतकऱ्यांच्या रस्ते वहिवाट सुनावणी बाबत पक्षपातीपणा केला,विविध विभागाच्या कामकाजाबद्दल तक्रारींचे निवड निराकरण केलेले नाही, तालुक्याचे जबाबदार अधिकारी असताना संवेदनशील पणा दाखवला नसल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.तहसीलदार रांजणे यांच्या कामकाजाबाबत लाचलुचपत खाते व महसूलमंत्र्याकडे याची रीतसर लेखी तक्रार करण्यात आली होती.त्यामुळेच राज्य शासनाने त्यांची बदली केल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.त्याबद्दल राज्य शासनाचे त्यांच्या बदली केल्याबद्दल आम्ही अभिनंदन करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवले.यावेळी पंचायत राज व ग्राम विकास जिल्हाध्यक्ष महेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न गोसावी,तासगाव तालुका उपाध्यक्ष संतोष पोळ,पंढरीनाथ पाटील,पोपट हंकारे,सुनील गायकवाड,भगवान पाटील,प्रशांत कुलकर्णी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.