प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेकडून माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार आणि विधवा महिलांना राष्ट्रध्वज वाटप कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आझादी का अमृतमहोत्सव आणि घरोघरी तिरंगा तसेच माजी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानातर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या कोविडमध्ये उत्कृष्ट काम केलेले माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार आणि विधवा महिलांना राष्ट्रध्वज वाटप असा संयुक्त कार्यक्रम महापालिकेत पार पडला. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नियंत्रणाखाली हा कार्यक्रम पार पडला.
महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते कोविडमध्ये उत्कृष्ट काम केलेले माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदार यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात मनपा क्षेत्रातील 75 विधवा महिलांना राष्ट्रध्वज वाटप करण्यात आला. या कार्यक्रमात जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांचा सन्मानचिन्ह देत विशेष सत्कार केला.
या सर्व कार्यक्रमास उपायुक्त चंद्रकांत आडके,सभागृह नेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, माजी महापौर आणि नगरसेविका संगीता खोत, नगरसेविका कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे आणि सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.