प्रतिष्ठा न्यूज

संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी एकाच वेळी सर्व नगरसेवक मैदानात उतरणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी एकाच वेळी सर्व नगरसेवक प्रचारात उतरणार आहेत. सर्व प्रभात एकाच वेळी पत्रके वाटण्यात येणार आहेत. भाजपच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ज्येष्ठ नेते दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संजयकाका पाटील यांच्या जन संपर्क कार्यालयात झाली. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, माजी महापौर गिताताई सुतार, माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी, युवराज बावडेकर, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सविता मदने, गजानन मगदूम, लक्ष्मण नवलाई, सुब्राव मद्रासी, अप्सरा वायदंडे, कल्पना कोळेकर, सुनंदा राऊत, भारती दिगडे, विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, भालचंद्र साठे, गीतांजली ढोपे- पाटील यांच्या सह सांगली विधानसभेच्या हाद्दीतील सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
शुक्रवारी दि १२ रोजी सकाळी ९ वा प्रत्येक नगरसेवक व नगरसेविका यांनी घरोघरी जावुन प्रचार करण्यासाठी बाहेर पडायचे आहे. भाजप कार्यकर्त्यासह व माहायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेवून घरोघरी प्रचारासाठी नियोजन करावे तसेच प्रचाराचे फोटो ग्रुपवर व सोशल मीडीयावर सर्वांनी प्रसारित करावे. याबाबत शेखर इनामदार व दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.