प्रतिष्ठा न्यूज

लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा राज्य सरकारने तातडीने करावा: हिंदू एकता च्या हिंदू मेळाव्यामध्ये ठराव

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने हिंदू मेळाव्याचे आयोजन कच्छी जैन भवन येथे करण्यात आले होते. या मेळाव्याचा शुभारंभ ह. भ. प. प्रसिद्ध उद्योगपती मनोहरभाई सारडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केले. या मेळाव्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्याचबरोबर लँड जिहाद उध्वस्त करणाऱ्या भाजपा नेत्या नीताताई केळकर व धर्मांतर केलेल्यांना हिंदू धर्मात परत आणण्याचे कार्य केल्याबद्दल हिंदू धर्म रक्षक पुरस्कार मिळालेल्या श्री अभिमन्यू भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले की, लव जिहाद विरोधात शहरी भागात जागृती झाली आहे मात्र आता ग्रामीण भागातील मुलींवर लक्ष केले जात आहे. आपल्याला पाकिस्तानची भीती नसून अंतर्गत शत्रूंची भीती आहे. सर्व धर्म समभाव म्हणत फिरणारेच शत्रू आहेत. भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे त्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, लव जिहाद्यांच्यापासून हिंदू मुली वाचवण्याबरोबर हिंदू धर्मीयांचे ख्रिश्चन धर्मात होणारे मोठया प्रमाणात होणारे धर्मांतराणापासून हिंदू धर्म वाचविण्यासाठी लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा राज्यातल्या सरकारने तातडीने करावा असा ठराव या हिंदू एकता आंदोलनाच्या हिंदू मेळाव्यामध्ये करण्यात येत आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विनापरवाना वापरण्यात येणारे मशीदींच्या वरील भोंगे बंद व्हायचे असतील तर हिंदूंनी आपापल्या मंदिरांवर स्पीकर लावले पाहिजेत तरच मशिदींवरील भोंगे बंद होतील.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मनोहर सारडा म्हणाले की, भगव्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत भगव्याचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही अ अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या दिवशी उपस्थित राहण्याचा मान देखील मला मिळाला मी भाग्यवान आहे.

सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केले तर आभार ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी मांडले. यावेळी साताराचे हिंदू एकताचे चंद्रकांत जरांगे व भाजप नेत्या नीताताई केळकर यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

यावेळी विनायक अण्णा पावसकर, हिंदू एकताचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, पैलवान विजय टोने, ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे, शहराध्यक्ष सोमनाथ गोठखिंडे, प्रकाश चव्हाण, विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, ॲड. स्वाती शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास चौथाई, परशुराम चोरगे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, सुनीता इनामदार, सुरज मामा पवार, पंडितराव बोराडे, रावसाहेब खोजगे, श्रीकांत तात्या शिंदे, गोपाळराव माने, विजय कडणे, सुरेश दोडिया, तानाजी शिंदे, वीर कुदळे, सुरेश शेळके, शुभम खोत यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या हिंदू मेळाव्यास उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.