प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या: अध्यक्षपदी- गोविंद कदम तर उपाध्यक्षपदी- उत्तमराव हंबर्डे यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : नुकतीच लोहा तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या नुतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी- गोविंद कदम तर उपाध्यक्षपदी- उत्तमराव हंबर्डे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पत्रकार संघटन वाढवून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष- संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य सुरू आहे. जिल्हाध्यक्ष- श्रीनिवास भोसले, महानगराध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्यासोबत चर्चा करून लोहा येथील पत्रकारांची छोटेखानी बैठक घेऊन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी- गोविंद कदम, उपाध्यक्षपदी- उत्तमराव हंबर्डे, सरचिटणीस- माधव पांचाळ, कोषाध्यक्ष- लक्ष्मण मोरे, कार्याध्यक्ष- विनोद मस्के, सचिव- बालाजी नागसाखरे, प्रसिद्धीप्रमुख-सुनील पवार, सदस्य-गजानन चव्हाण, अविनाश हंबर्डे, चंद्रधर खानसो, गंगाराम तेलंग, पांडुरंग रहाटकर आदींची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल मारतळा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष- गणेशराव पाटील ढेपे, संजय देशमुख, वसंत सिरसाट, बालाजी शिंदे, नागेश वडवळे, बालाजी सिरसाट, तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.