प्रतिष्ठा न्यूज

करुळ घाटात दरड कोसळली, मोठा दगड रस्त्यावर आला

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : घाटमाथा, सह्याद्री परिसर तसेच गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे.अतिवृष्टीत करुळ घाटात रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे वाहातूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने पोलिसांनी दरड बाजूला केल्यानंतर वाहातूक सुरळीत केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली.
रविवार मध्यराञीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून दिवसभर पावसाची जोरदार बॕटींग सुरु होती. सह्याद्रीपरिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे करुळ घाटात गगनबावड्यापासून २ कि.मी. अंतरावर भला मोठा दगड रस्त्यावर आला. दगड रस्त्यावर मधोमध असल्यामुळे वाहातूक विस्कळीत झाली होती. पोलिसांना माहीती मिळताच पोलिस हवालदार राहुल पवार, रमेश नारणवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबी बोलावून रस्त्यावरचा दगड बाजूला करुन वाहातूक सुरळीत केली. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर अनेक छोटे काॕजवे व मो-यां पाण्याखाली गेल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.