प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात ‘कोसळधार’ दिवसभरात १७४ मि.मी. पाऊस ; घरांची पडझड चालूच

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : काल तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दिवसभरात १७४ मि.मी. पावसाची नोंद झाली. कुंभी धरण क्षेत्रात १३२ मि.मी.पाऊस झाला असून आज अखेर २२६३ मि.मी.पाऊस झाला आहे.
तालुक्यात घरांच्या पडझडींची मालिका चालूच आहे. परवा खोकुर्ले येथील यशवंत भागोजी कांबळे यांच्या राहत्या घराची पडझड झाली. तर काल आणखी चार घरांची पडझड होऊन ४० हजारांचे नुकसान झाले.असळज येथील धोंडीराम सिताराम कांबळे यांच्या राहत्या घराची पडझड होऊन १२०००चे नुकसान झाले. निवडे येथील मुबारक हुसेन नंदनकर यांच्या राहत्या घराची भिंत पडून ९००० चे नुकसान झाले. तर धुंदवडे येथील संभाजी बबन पाटील व सखाराम बाळू कांबळे यांचे घराची पडझड होऊन अनुक्रमे १२०००व ९००० असे नुकसान झाले. एकूण नुकसान अंदाजे चाळीस हजार झालेली आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत तातडीने नुकसान भरपाईचे  पंचनामे करण्यात आलेले आहेत.
तालुक्यात गेल्या सोमवारपासून   जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गगनगड, पळसंबे रामलिंग लेणी, लखमापूर, अंदुर,कोदे, वेसरफ डॅम व तेथील सांडव्याच्या परिसरात जाण्यासाठी  नागरिक व पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.”
-डॉ. शैलजा पाटील, तहसीलदार गगनबावडा 
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.