प्रतिष्ठा न्यूज

हरिपुरच्या सुनीता शेरीकर एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित..!

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील हरिपुरच्या सुनीता मारुती शेरीकर यांना सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल एक्सलन्स इन सोशल वर्क या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेडिओ ऑरेंज कडून या कार्यक्रमाचे आयोजन व्हिएतनाम देशातील होणाई या शहरात करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थतीतीत हा समारंभ संपन्न झाला.
हरिपूर येथे शेरिकर यांनी बालाजी गारमेंट ची स्थापना करून परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी या गारमेंटची मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. मागील अकरा वर्षापासून बालाजी गारमेंट या आपल्या व्यवसायातून सुनिता शेरकर यांनी महिलांना स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवल आहे. समाजामध्ये वावरत असताना पुरुषांच्या बरोबरीने सक्षम होण्यासाठी त्या स्त्रियांना मदत करत असतात. विविध सामाजिक संस्था व संघटना यांच्या माध्यमातून सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सौ शेरीकर यांना महिलांसाठी हे काम उभा करण्यामध्ये त्यांचे पती श्री मारुती शेरीकर मुलगा व परिवार यांची साथ मिळाली. त्यांच्या या कार्याचा विचार करून रेडिओ ऑरेंज च्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रेडिओ ऑरेंज कार्यकारी संचालक सो इनू मुजुमदार उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.