प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एनडीआरएफ मार्फत प्रशिक्षण उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज दि १८ रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली येथे एनडीआरएफ यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन, पूर परिस्थिती नियंत्रण प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मा. जिल्हाधिकारी श्री .राजा दयानिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, अति आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षणाच्या सुरुवात करण्यात आली आहे . एनडीआरएफ पथकाचे स्वागत मा जिल्हाधिकारी राजा दयानिधी मा आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे, या वेळीएनडीआरएफ पथकाचे श्री पुनिया यांनी आपत्ती याबाबत प्राथमिक माहिती देऊन आपत्ती निराकरण करण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली .पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्ती बाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी करावे उपाय आहेत. यावर माहिती दिली आहे.

दुसरा सत्रात आपत्ती व्यवस्थापन मध्ये वैद्यकिय मदत अत्यंत महत्त्वाचे असते, त्या बाबत माहिती देण्यात आली आहे, या मध्ये CPR बाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले . उपस्थितीत प्रशिक्षनार्थी यांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन , CPR बाबत अधिक माहिती घेतली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.