प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर स्वच्छतेचा बोजवारा -आयुक्तांनी लक्ष घालावे लोकहित मंचेचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीची ओळख असणाऱ्या गोष्टींपैकी महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे एक असून ,सध्या या स्टेडियम मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून गॅलरी खाली कचऱ्याचा उकिरडा बनलाय .स्वच्छतागृह तुंबलेले आहे तर जिन्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर गुटखा मावा खाऊन थुंकून हे कोपरे रंगवण्यात आलेत .शिवाय टेरेसवर तर दारूच्या बियरच्या बाटल्या आणि धक्कादायक बाब म्हणजे इंजेक्शनच्या बाटल्यांसह अनेक सिरीज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांना आढळून आल्या आहेत .


दरम्यान महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात आणि या ठिकाणी रात्रीची पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणीही अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे .

ही

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.