प्रतिष्ठा न्यूज

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांसंदर्भात आढावा बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश आगडे
चंद्रपूर : आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह, ब्रम्हपुरी येथे चिमूर विधानसभा क्षेत्राअतंर्गत येणा-या गावातील, राज्य / केंद्र शासनाच्या विविध योजना, विविध समस्या व विकासकामांसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा करून संपूर्ण २८ ग्रामपंचायतींचा आढावा घेतला. तसेच, उर्वरित विकासकामे जलदगतीने पूर्ण व्हावे याकरिता संबंधित प्रशासनाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

या बैठकीदरम्यान ‘लम्पी स्किन’ आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम शिबिराद्वारे मोठया प्रमाणात राबविल्या गेली व जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी श्री. शिरीष रामटेके सर यांनी आमदार महोदयांना दिली असता त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे व संपूर्ण पशुवैद्यकीय विभागाचे अभिनंदन करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी संदीप भसके सर, तहसीलदार उषा चौधरी मॅडम, बिडिओ पुरी सर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा जिल्हा महामंत्री कृष्णाभाऊ सहारे, भाजपा ज्येष्ठ – नेते दीपकभाऊ उराडे, नागोराव पिल्लारे, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, माजी जि.प. सदस्या दिपाली मेश्राम, माजी नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे, माजी उपाध्यक्ष न.प. नागभीड गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, रविभाऊ मेश्राम, सुनंदा ढोरे, ममता कुंभारे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारीगण उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.