प्रतिष्ठा न्यूज

राज्यातील सत्ता नाट्यानंतर तासगावात मनसेकडून अनोखी पोस्टरबाजी : एकला चलो रे मनसेची विधानसभेची तयारी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रवादीचें फायर ब्रँड नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात राजकीय उलथा पालथ सुरु झाली.त्यानंतर मुंबईसह राज्यात मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली.एक वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आणि भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाले.त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीतही फुट पडली आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडली व सत्तेत सहभागी झाले.त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे याची चुणक आता सर्वांनाच लागली आहे.त्यामुळे या सर्वांना रोखायचे असेल तर राज ठाकरे यांचा मनसे पक्षच राज्यात पर्याय म्हणून असल्याचे मनसे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.त्याअनुषंगाने संपूर्ण राज्यात फक्त राज ठाकरे एकच पर्याय म्हणून मनसैनीका कडून बॅनर बाजी केली जात आहे.त्याच पार्श्व भूमीवर तासगावा मनसेचें जिल्हा संघटक अमोल काळे यांनी स्टँड चौकात राज ठाकरेंच्या समर्थनातं एक डिजिटल लावले आहे.त्या डिजिटल वरील मजकूराची चर्चा सध्या शहरात जोरदार पणे सुरु आहे.*कार्यकर्ते उपाशी,नेते तुपाशी महाराष्ट्राचे गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी आता साथ फक्त मा.राजसाहेबाना* या डिजिटलने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात आहे.आगामी सर्वच निवडणुकित मनसे स्वबळावर लढणार असल्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत.तासगाव कवठे महांकाळ विधानसभेची निवडणूक मनसे लढवणार असून त्या अनुषंगाने मनसे कडून जोरदार तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.