प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या वि.स.पागे महाविद्यालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती तासगांव व बार असोशिएशन तासगांव यांचे संयुक्त विद्यमाने दि १५/०७/२०२३ रोजी महाराष्ट्ररत्न वि. स.पागे महाविद्यालयात कायदेविषयक शिबीर पार पडले.यावेळी न्या.डी ए दरवेशी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश तासगांव,प्रमुख वक्ते ऍड ए.जी. शिंदे अध्यक्ष बार असोशिएशन तासगांव,ऍड एस.बी.कोरटे उपाध्यक्ष बार असोशिएशन तासगांव,ऍड निलेश कुंभार,ऍड.प्रतिक आर चव्हाण,ऍड.एस.जे.महामुनी व कॉलेजचे प्राचार्य दिलीप थोरवत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य दिलीप थोरवत यांनी केले.ऍड चव्हाण यांनी पोक्सो अॅक्ट कसा आहे,त्याची अंमलबजावणी कशी होते लहान मुलांचे हक्क व त्याच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती याविषयी सविस्तर माहिती दिली.ऍड शिंदे यांनी जुवेनियल जस्टीस अॅक्ट बद्दल सर्व माहिती देऊन त्यासाठी असणारे स्वतंत्र कोर्ट त्याची कार्यपध्दती व लहान मुलांच्या वर्तणूक बदलावर कायद्याने कशा प्रकारे भर दिला जातो हे सांगितले.ऍड निलेश कुंभार यांनी बेटी बचाव बेटी पढाव योजनेची सुरूवात का व कशी झाली सांगून त्यांच्या अंमलबजावणीची का गरज निर्माण झाली आहे सांगितले. त्यासोबतच सरकार मार्फत मुलींसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्यांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात डी.ए.दरवेशीसो यांनी या सर्व कायद्यांचा विश्लेषण करतानाच महिलांना समाजात आदर मिळविण्यासाठी त्यांनी स्वतःला कशा प्रकारे सिध्द करणे गरजेचे आहे हे सांगितले,व कॉलेज वयात
होणारे आकर्षण टाळून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाचे आभार शिक्षक गुरव मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षकवृंद यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.