प्रतिष्ठा न्यूज

“भारत जोडो यात्रा” निमित्ताने महाविकास आघाडीतील पक्ष प्रमुखांनी नांदेड भेटीचे निमंत्रण स्वीकारले

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : कॉग्रेस पक्षाचे युवा नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या “भारत जोडो यात्रा” दि.7 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात येणार असून सदर यात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सहभागी व्हावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेऊन निमंत्रण दिले असुन त्यांनीं ते निमंत्रण स्वीकारले आहे.

तसेच माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांनाही निमंत्रण दिले व त्यांनी पण निमंत्रण स्वीकारले आहे.

या शिष्टमंडळात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री एच.के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधान परिषदेतील गटनेते अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी मंत्री प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, प्रदेश सरचिटणीस रामचंद्र दळवी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.