प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज अखिल मानव जातीचे – विक्रांत पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखिल मानव जातीसाठी कार्य केले त्यांना एका विशिष्ट जातीत कोंडून ठेवणे ही त्यांच्या विचारांशी प्रतारणा करणे आहे.आधुनिक काळात सुध्दा कुठल्याही माणसाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांशी झुंजण्यासाठी शिवरायांचे चरित्र हे प्रेरित करते.अखंड विश्वाने महाराजांचा आदर्श घेतला असून आपणाला त्याचा अभिमान असलाच पाहिजे” असे प्रतिपादन वक्ते विक्रांत पाटील यांनी मतकुणकी येथील शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात केले.
पाटील बोलताना पुढे म्हणाले की, “रोजच्या जगण्यात दुर्दैवाने आम्ही छत्रपती, भवानी हे शब्द सुध्दा बदनाम केलेत केवळ गाडीच्या टपावरून महाराजांची मूर्ती नेऊन त्याचं पूजन करून काही होत नाही. त्यासाठी, महाराजांचे विचार मस्तकात घुसविण्याची गरज आहे.प्रतिमा पूजन करा पण विचारांचे मात्र दफन करण्याचं पाप करू नका”. मतकुणकी येथील जय शिवराय ग्रुप कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण जगात क्रांती घडविण्याची ताकद असलेल्या संत विचारांचा जागर करीत रायरेश्वर ते किंजळगड अशी मोहीम या ग्रुपने काढली होती.
यावेळी जय शिवराय ग्रुप चे सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील अनेक रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.