प्रतिष्ठा न्यूज

भारत – नेपाळ विश्व साहित्यसंमेलनाचे अक्षरयात्री प्रतिष्ठानने टाकले पहिले पाऊल : डॉ .स्वाती शिंदे -पवार यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरयात्री प्रतिष्ठान विश्व संमेलनाच्या दिशेने पहिलेवहिले पाऊल टाकत आहे . भारत आणि नेपाळ यांच्यातील साहित्यिक मैत्रीचा पूल बांधणारे आणि बहुभाषिक प्रतिनिधींना सोबत घेऊन संपन्न होणारे हे साहित्य संमेलन काठमांडू शहरात भारतीय दूतावासाच्या एम .पी . हॉलमध्ये होणार आहे. या संमेलनासाठी अकरा भाषेतील प्रतिनिधी निमंत्रित आहेत . दोन्ही देशांच्या भाषेचा आदान – प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात व्हावा या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात येत आहे . संमेलन २१ तारखेला काठमांडू शहरात संपन्न होईल या संमेलनाने बहुभाषिक साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या दोन्ही देशातील प्रतिनिधींच्या विचारांची वैचारिक देवाण-घेवाण आयोजित केली आहे . अशी माहिती डॉ .स्वाती शिंदे -पवार यांनी दिली.
यावेळी मराठी, हिंदी, इंग्लिश, नेपाळी, अवधी, भोजपुरी, बांग्ला, उर्दू, संस्कृत इ. अकरा भाषेतील ३० निमंत्रित कवी सहभागी होत आहेत.
भारतातून डॉ . उर्मिला चाकूरकर पैठण, मनोज पाठक बुलढाणा , प्रा . डॉ .विलास पाटील परभणी, डॉ .ज्योती कदम नांदेड ,आशा डांगे औरंगाबाद, डॉ . शुभा लोंढे पुणे ,डॉ . प्रीती शिंदे -पाटील कोल्हापूर, अनुजा पाटील तासगाव ,चंद्रशेखर पाटील सांगली, डॉ .स्मिता पाटील सोलापूर, दिनकर जोशी बीड, संध्या धाटे अंबाजोगाई हे सहभागी होत आहेत .
अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा भारत आणि राजदूतावास काठमांडू नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरयात्रीचे २५ वे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन नेपाळच्या पवित्र भूमीत विश्व संमेलन म्हणून साजरे होत आहे .
या संमेलनासाठी भारतातून दहा साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे . अशी माहिती अक्षरयात्री प्रतिष्ठानचे कार्यवाह श्री . अनिल पवार यांनी दिली .
या आंतरराष्ट्रीय बहुभाषिक संमेलनाचे संयोजन नेपाळ सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख असावरी बापट या करीत आहेत .
संमेलनानंतर या संमेलनामध्ये सादर केलेल्या कवितेचे बहुभाषेत भाषांतर होऊन त्याचे पुस्तक रूपाने संपादन तयार होणार आहे . ही या संमेलनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे .
या संमेलनाचे अध्यक्षपद डॉ.संजीता वर्मा हिंदी विभागप्रमुख त्रिभुवन विश्वविद्यालय या भूषविणार आहेत .मुख्य अतिथी म्हणून नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठानचे कुलपती श्री . भूपाल राय आहेत .
सह अध्यक्ष डॉ .उर्मिला चाकूरकर व डॉ .काशिनाथ न्यौपाने हे आहेत . विशिष्ट अतिथी श्री गिरीश चन्द्र लाल,नेपाळ उच्चतम न्यायालयाचे न्यायाधीश तसेच प्रो. माधव प्रसाद पोखरेल व डॉ .गंगाप्रसाद अकेला ज्येष्ठ साहित्यिक व डॉ .स्वाती शिंदे – पवार भूषविणार आहेत.
दोन्ही देशाच्या दूतावासाने आयोजित केलेला भारतातील अक्षरयात्री प्रतिष्ठानचा हा उपक्रम एकमेव असून तो कौतुकास्पद आहे .
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.