प्रतिष्ठा न्यूज

वासुंबेत 3 किलो गांजा जप्त… तासगाव पोलिसांची कारवाई…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध्य धंदयावर कारवाई करणे बाबत पोलीस अधिक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधिक्षक रितु खोखर  यांनी आदेश दिले आहेत त्याप्रमाणे तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचे मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार हे अवैध्य धंदयाबाबत माहीती मिळवित असताना,गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार पो.शि.विठ्ठल सानप व पो.शि.विवेक यादव यांना माहीती मिळाली की राखी अशोक पवार रा.वासुंबे ता.तासगांव ही तिचे राहते घरासमोर वासुंबे गावी एका प्लॅस्टीकच्या पिशवीत गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणे करीता गांजा घेवुन थांबली आहे अशी माहिती मिळाल्या नंतर तात्काळ पो.शि.विठ्ठल सानप व पो.शि.विवेक यादव यांनी बातमीची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना सांगितली.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना तात्काळ त्यांचे दालनात मसपोनि काळगांवे,पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, पोहेकॉ/१३३३ सूर्यवंशी,पोना/१९९४ चव्हाण,पोकॉ/२२१६ सानप,पोकॉ/९०३ खाडे, मपोकॉ/२१५५ खरमाटे, मपोकॉ/१६७ खोत यांना बोलावुन घेऊन तासगांव पोलीस ठाणे हद्दीत वासुंबे गावी राखी अशोक पवार रा. वासुंबे हि तिचे प्लॉस्टीकच्या पिशवीत गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणे करीता थांबली असलेबाबत विश्वसनीय व गोपनिय माहीती खास बातमीदारामार्फत मिळाली असल्याचे सांगितले.पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सदर मिळाले बातमीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव विभाग तासगांव यांना दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव विभाग तासगांव यांनी एनडीपीएस अॅक्ट ४१ (२) प्रमाणे छाप्याकामी व पुढील कायदेशीर कारवाईकामी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना अधिपत्र दिले.सोमनाथ वाघ,यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शासकिय पंच यांना बोलावुन घेवून छाप्यासाठी लागणारे साहित्यासह रवाना होवुन राखी अशोक पवार हिचे राहते घरामोर बातमी प्रमाणे वॉच केला असता,राखी अशोक पवार हि घराबाहेर पिशवी घेवून बसलेली दिसली बातमीप्रमाणे तिचा संशय आलेने तिला छापा टाकुन जागीच पकडले असता पंचासमक्ष तिची अंगझडती घेतली असता तीचे कब्जात मिळून आलेली प्लॉस्टीकची पिशवी उघडुन पाहता त्यामध्ये एका प्लॅस्टिकचे पिशवीत काळपट हिरवट रंगाचा ०३ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा वनस्पतीचा पाला व रिकामे प्लॅस्टिकचे पाऊच मिळुन आले,असून त्याची किंमत ७७,५००/- रुपये होत असून, तो जप्त करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.