प्रतिष्ठा न्यूज

केसराळी येथील विश्वजित शिंदे याची नवोदय विद्यालयासाठी निवड

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : केंद्रीय परीक्षा मंडळाकडुन २९ एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. बिलोली तालुक्यातील कार्ला खु. येथील सनशाईन इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी विश्वजीत शिंदे याची नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे.
शाळेच्यावतीने दि. २६ जुन रोजी संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण मेरगु, प्राचार्य प्रेमा मेरगु, सचिव स्नेहा मेरगु, राजु पाटील शिंपाळकर, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव मावलगे, ए. जी. कुरेशी, सय्यद रियाज, संजय चरकुलवार, अनिल तमलुरे प्रा.अनिल शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती, शिवसेना नेते श्रीराम पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विश्वजीत, त्याचे आई-वडील व आजी-आजोबांचा शाल, श्रीफळ पुष्पहार व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. गेल्यावर्षी याच शाळेच्या श्रावणी पाटील हिची शंकरनगरच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आली होती. तिचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.