प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील भूमीपूत्र प्रा डॉ अनिल शिंदे केसराळीकर यांना 2023 चा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : बिलोली तालुक्यातील केसराळी येथील रहिवासी व नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील महाराज ज.पो. वळवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक असलेले अनिल शिंदे यांना यंदाचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन त्यांचा २४ जुन रोजी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
प्रा. अनिल शिंदे हे मूळ नांदेड जिल्ह्यातील केसराळी या गावचे उच्चशिक्षित आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील महाराज ज. पो. वळवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक या पदावर कार्यरत असून विद्यार्थी घडवण्याचे काम करीत असताना त्यांनी आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कार्य करीत अनेक विद्यार्थी घडवले असल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून निवड करीत त्यांना यंदाचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, ज्ञानेश्वर सनाब अध्यक्ष संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार, दीपक पाटील मुख्याधिकारी नाशिक विभाग, आ. माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. अनिल शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचे नांदेड जिल्ह्यातील मित्र मंडळी, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.