प्रतिष्ठा न्यूज

ज्ञानदीप हायस्कूल सावरगाव ता.हदगाव शाळेचे 10 वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड प्रतिनिधी : मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला करण्यात आला. त्यात ज्ञानदीप शाळा सावरगाव ता.हदगाव शाळेचा 95% निकाल लागला असून शाळेतून प्रथम येण्याचा मान 1)कु.श्वेता लक्ष्मण डाके 82% (2)कु.शिवानी राजू मडके 81.40% (3)कु. मयुरी बालाजी मिराशे -80.60% तसेच 0विशेष प्राविण्यासह उमेश नंदकुमार झाडे -77% ,समीर युनूस शेख 75 टक्के ,कुमारी श्रद्धा रामजी आदमाने 75 टक्के, गुण प्राप्त करून शाळेचा मान वाढविला आहे 40 विद्यार्थ्यापैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यात विशेष प्राविण्यासह 06, फर्स्ट ग्रेड मध्ये 06, सेकंड ग्रेड मध्ये 23 ,पास 03 असे यश प्रधान केलेले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक राम मेटकर, उपाध्यक्ष श्री मिलिंद लोखंडे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री कचरू गारोळे व संस्थाप्रमुख मुख्याध्यापक श्री बेडके सर, सहशिक्षक ठाकूर सर, कारखेडे सर , वर्ग शिक्षक श्री एम एस हत्ते सर आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री गारोळे सर ,गोविंद मुळेकर, रोहिदास डाके यांनी सर्व विद्यार्थ्या अभिनंदन केले व मुख्याध्यापक बेडके सर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा कौतुक केले पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन.तसेच प्रतिष्ठा न्युज नांदेड टीम कडून सूद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.