प्रतिष्ठा न्यूज

तासगाव अर्बन बँकेची 88 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; बुधवार पासून बँकेचीं ए टी एम सेवा सुरु

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट बँक म्हणून नावारुपास आलेली दि तासगांव अर्बन को-ऑप. बँक लि., तासगांव ची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात कोहीनूर मल्टी पर्पज हॉल,तासगांव येथे पार पडली.
सभेच्या सुरुवातीस उपस्थित सर्व सन्माननीय सभासद बंधू व भगीनींचे स्वागत बँकेचे व्हा. चेअरमन श्री. कुमार शेटे यांनी केले. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेची प्रगती सुरु आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेस पुणे विभागातून दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन कडून पद्मभुषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक या पुरस्काराने सन्मानीत करणेत आलेले आहे. बँकेने आपल्या ४०० कोटी व्यवसायाचा टप्पा पुर्ण केलेला असून लवकरच बँकेचा एकूण व्यावसाय ५०० कोटी पर्यंत नेणेचा बँकेचा मानस आहे. असे मनोगत त्यांनी सभेपुढे व्यक्त केले.सभेचे प्रास्तावीक संचालक श्री.विनय शेटे यांनी केले.व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करणेत आले.तद्नंतर अहवाल सालात दिवंगत झालेल्या थोर राजकीय नेते,संशोधक,शास्त्रज्ञ, लेखक,साहित्यिक,कलाकार,खेळाडू तसेच सीमेवरील शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहनेबाबत चा ठराव संचालक श्री.राजेंद्र माळी यांनी मांडला.त्यानंतर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहुन श्रध्दांजली वाहनेत आली.
अध्यक्ष श्री महेश्वर हिंगमिरे यांनी सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना आपणास सांगणे अत्यंत आनंद होत आहे की,बँकेस रिझर्व्ह बँकेकडून विटा,पंढरपूर व सोलापूर येथे तीन नवीन शाखा उघडणेस मंजुरी मिळालेली आहे व लवकरच सदरच्या शाखा सुरु करीत आहोत. बँकेकडील ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरु करणेसाठीची सर्व तयारी पुर्ण केलेली असून बुधवार दि. १३/०९/२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता प्रांताधिकारी मा. श्री उत्तमराव दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते व तहसिलदार मा.रविंद्र रांजणे सो, तासगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पृथ्वीराज पाटील व सहाय्यक निबंधक मा.रंजना बारहाते यांच्या शुभहस्ते घेणेत येणार आहे.यावेळी चेअरमन यांनी उपस्थित सर्व सभासदांना त्यांच्या शेअर्स खातेस वारसनोंद करणेबाबत व मयत सभासदांचे असलेले वारसदार यांनी शेअर्स ट्रान्फर साठी बँकेकडे अर्ज सादर करावेत तसेच ज्या सभासदांचे शेअर्स १० किंवा १०० रुपयाचे आहेत त्यांनी आपली शेअर्स रक्कम पुर्ण करुन घ्यावी असे सांगीतले.तसेच भारताने यशस्वी केलेल्या चांद्रयान ३ मोहिमेबद्दल इस्त्रो कडील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व सर्व टीम यांच्या अभिनंदनाचा
ठराव तसेच शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छांचा ठराव मांडला व तो यावेळी संमत करणेत आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत कुलकर्णी यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले.सर्व विषयांवर सभेमध्ये चर्चा झाली.सभासदांनी सर्व विषयांना मान्यता दिली.लाभांश विषयावर सखोल चर्चा झाली त्यावर बँकेचे तज्ञ संचालक उदय डफळापूरकर (सीए) यांनी रिझर्व्ह बँक व सहकार बँकांची याबाबतची नियमावली सभासदांना समजावून सांगितली.तद्नंतर सर्व सभासदांनी एकमताने १२ टक्के लाभांश देणेस मान्यता दिली.या प्रसंगी अहवाल सालात विशेष कामगिरी केलेल्या बँकेच्या सभासदांचे सत्कार करणेत आले.त्यामध्ये तासगांव नगरीचे माजी नगराध्यक्ष अमोल (नाना) शिंदे, तासगांवचे तलाठी पतंगराव माने, विपुल येडेकर,योगेश शिंत्रे,तासगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,विद्युत वितरण कंपनीचे भोईटे यांचा समावेश आहे.तसेच तासगांव तालुक्यामध्ये शालांत परिक्षेमध्ये प्रथम क्रमाक सोहम म्हेत्रे व व्दितीय क्रमांक राहुल पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.ज्या सभासदांनी आपल्या वयाची ७१ वर्षे पुर्ण केलेली आहेत अशा सर्व सभासदांचा यथोचित सत्कार करणेत आला.
बँकेला दि महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन कडून पुणे विभागातून कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून पुरस्काराने सम्नानीत करणेत आलेले आहे. त्याबद्दल जागृत ग्राहक राजा, सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य यांचेकडून सन्मानपत्र देणेत आले.हे सन्मानपत्र संघटनेचे विभागीय संघटक मिलींद सुतार व सांगली महानगर संघटक अभिजीत रजपूत यांच्या शुभहस्ते देणेत आले.तसेच व्यापारी असोसिएशन कवठेमहांकाळ येथील प्रसिध्द व्यापारी वैभव बोगार, रणजीत घाडगे,बंडू पाटील,दिगंबर पाटील,बाळासाहेब शेटे,जत येथील प्रसिध्द व्यापारी मनोज जेऊर, दस्तगीर नदाफ,अशोक तेली, तासगांव मधील सभासद व्ही एम पाटील सर वगैरे सभासदांनी बँकेस मिळालेल्या पुरस्काराबद्दल व बँकेने कलेल्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल सर्व संचालक सदस्यांचा सत्कार केला.
सभेमध्ये झालेल्या चर्चेत सभासदांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.अनुभवी सभासदांनी संयमाने विषय हाताळल्याने सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.त्यानंतर उपस्थित बँकेचे संचालक विनय शेटे यांनी उपस्थित सर्व सभासद बंधू भगीनिंचे आभार मानले.
यावेळी बँकेचे सर्व सन्माननीय सभासद,चेअमन श्री महेश्वर हिंगमिरे, व्हा.चेअरमन श्री कुमार शेटे,संचालक श्री.सदाशिव शेटे, श्री. अरुण पाटील, श्री. विनय शेटे,श्री.अनिल कुत्ते,श्री उदय वाटकर,श्री.धोंडीराम सावंत,श्री. रामशेठ शेटे,श्री.राजेंद्र माळी,श्री सौरभ हिंगमिरे,श्री.उदय डफळापूरकर,श्री.आशिष अडगळे, श्रीमती सविता पैलवान,सौ.उमा हिंगमिरे,व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री अवधूत गडकर,श्री रविंद्र देवधर,श्री प्रदिप पवार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी, असि.जनरल मॅनेजर श्री.नारायण सगरे व श्री विनायक मेंडगुले,सर्व स्टाफ व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.