प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील हदगाव,नायगाव कंधार तालुक्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू: नागरिक,महिलांचा वाढता पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज/ जिल्हा प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार,नायगाव,हदगाव तालूक्यात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील आंदोलक जरांगे पाटिल यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणुन पेठवडज येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकनाथ डावकोरे (ग्रां.पं.सदस्य) व संभाजी गोंधळे हे दि. ७ सप्टेंबर पासुन ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज समोर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या ऊपोषनाचा आज तिसरा दिवस आहे.

मराठा समाजाने आतापर्यंत 57 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले मात्र शासनाने आश्वासने दिली.तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवली ( अंबड) येथील आंदोलकांना लाठीचार्ज वापर करून निरपराध वृद्ध, स्त्री पुरुष यांना जखमी केले.आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.याचा आंदोलन कर्त्यांनी निषेध केला आहे.

कंधार तालुक्यातील पेठवडज येथील श्री एकनाथ डावकोरे, श्री संभाजी गोंधळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि.७ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला कुठलीही अट न टाकता आरक्षण जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
हदगाव येथे दत्ता पाटील हडसणीकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नायगाव तालूका येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू आहे.
यावेळी सरपंच प्रतिनिधी खुशाल राजे, व्यंकट पांढरे, माजी सरपंच शाम महाराज जोशी, आनंदा दामले, संतोष दामले, राऊस राजे, निळकंठ डावकोरे, अमोल कारभारी आदि उपस्थित होते. पेठवडज ग्रामपंचायत मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ठराव पास केला आहे. तसेच कौठा ता.कंधार, मौजे मारतळा ता.लोहा येथे व्यापार पेठ, बाजार,कडकडीत बंद ठेवून उत्स्फूर्त पणे पाठिंबा दिला.
दरम्यान कंधार शिवसेना तालूका प्रमुख श्री परमेश्वर पाटील जाधव, संभाजी ब्रिगेड चे श्री नितीन पाटील कोकाटे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.