प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज इंटरनॅशनल (प्री प्रायमरी) स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : केंब्रिज इंटरनॅशनल (प्री प्रायमरी) स्कूलमध्ये चिमुकल्या मुलांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. याप्रसंगी मुलांनी शिवछत्रपतींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत मुले पारंपारिक वेशभूषा करून भगवा झेंडा व विविध वाद्यासह सहभागी झाली.   छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामकरण सोहळा, पाळणा गीत, पोवाडा गायन करून पार पडला.
याप्रसंगी राजा शिवछत्रपती यांच्याविषयी प्राध्यापक सुनील लाड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिवाजी महाराजांचे जीवन, विविध घटना सांगून अतिशय रंजकपणे महाराजांचे जीवन मुलांना सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेच्या विविध विभागाचे प्राचार्य, केंब्रिज इंटरनॅशनल सुपरटेनडेंट ख्रिस्टीना मार्टिन, मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयक वंदना डोंगरे, अश्विनी येलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.