प्रतिष्ठा न्यूज

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडी सांगली शहर प्रमुख पदी नितु ताई चव्हाण यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे

सांगली : येथील युवा फौंडेशन संस्थेच्या संस्थापिका नितु ताई चव्हाण यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडी सांगली शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या फौंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामध्ये त्यांनी पूरपरिस्थिती मध्ये प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले. विविध उत्सव, सण व उद्योजकांचे वाढदिवस यांचे औचित्य साधत गोर- गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक साहित्य, कपडे, खाऊ वाटप तसेच गोर गरीब नागरिकांसाठी अन्नदानाचे काम करत आहेत. त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब, अबला महिलांना व मुलींना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. या सर्व कामाची दखल घेत त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडी सांगली शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.