प्रतिष्ठा न्यूज

बाकली येथील श्री साईनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : बाकली ता.शिरूर अनंतपाळ येथील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिनी 1मे 2023 रोज सोमवारी शाळेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष संग्रामआप्पा घारोळे यांच्या यांचे हस्ते करण्यात आला.
शैक्षणिक वर्षे 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या एन एमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून 69 वा क्रमांक प्राप्त केलेल्या या विद्यालयातील कु. अंकिता दत्ता शेळके व कु. प्रेरणा चरणसिंग राठोड यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्या बद्दल संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते 1मे महाराष्ट्र दिनी झेंडावंदन कार्यक्रम झाल्या नंतर संस्थेचे अध्यक्ष संग्रामआप्पा घारोळे यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
तसेच या विद्यालयातील विद्यार्थिनी कु. नंदिनी श्रीरंग क्षिरसागर हिने सारथी शिष्यवृतीसाठी परीक्षेत निवड झाल्यामुळे तिचाही शाळेच्यावतीने गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष- संग्रामआप्पा घारोळे, उपाध्यक्ष-रावसाहेब शिंदे, सचिव- धोंडियाप्पा स्वामी, हणमंत बालुरे, उपसरपंच- उमाकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य- पंकज रक्साळे, मुख्याध्यापक- एस.जी.येरोळे, एस.जी.सगरे, पी.डी.गुलफुरे, पी.एम. रोडगे, विवेक घारोळे, चरणसिंग राठोड, सह अनेक पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.