प्रतिष्ठा न्यूज

निखिल वागळे यांच्या हस्ते सोमवारी सांगलीत पत्रकारांना पुरस्कार व व्याख्यान

ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना जीवन गौरव : सुनील कदम, गुरुबाळ माळी, संपत मोरे यांच्यासह अनेक पत्रकारांना पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय पत्रकार स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने समोर दिनांक 8 मे रोजी पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान आणि पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांना जीवनगौरव सुनील कदम, गुरुबाळ माळी, संपत मोरे यांना राज्यस्तरीय आणि इतर पुरस्कारांची घोषणा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केली.
त्यातला पत्रकार निखिल वागळे हे निर्भयपणे अभियानाद्वारे राज्यातील मान्यवरांची संपर्क साधत आहेत त्या निमित्ताने खास पत्रकारांच्या साठी त्यांचे व्याख्यान सोमवारी दुपारी दोन वाजता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या निमित्ताने पत्रकार संघाने उत्तुंग कामगिरी केलेल्या पत्रकार मित्रांचा  गौरव करण्याचे ठरविले आहे. यामध्ये

*जीवन गौरव – दशरथ पारेकर*
(माजी संपादक सकाळ, लोकमत, तरुण भारत)

*विशेष गौरव – डॉ. वसंत भोसले*
डिलीट पदवी आणि मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल

*राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-*
सुनील कदम, पुढारी
गुरुबाळ माळी, महाराष्ट्र टाइम्स
संपत मोरे, सकाळ पुणे,

*उत्कृष्ट पत्रकारिता*
जयसिंग कुंभार सकाळ,
विनायक जाधव तरुण भारत
विकास सूर्यवंशी, केसरी
दत्तात्रय सपकाळ, पुण्यनगरी देवराष्ट्रे,
संतोष भिसे, लोकमत
किरण जाधव तरुण भारत जत,
राजेंद्र काळे, महासत्ता, विटा
सुरज मुल्ला तरुण भारत आटपाडी
प्रताप महाडिक लोकमत कडेगांव
विजय गराडे पुण्यनगरी शिराळा

*उत्कृष्ट छायाचित्रकार*
सचिन सुतार, पुढारी सांगली
सुरेश मोकाशी लोकमत शेटफळे
एस पी घोरपडे मुक्त छायाचित्रकार कडेगांव

*उत्कृष्ट व्यंगचित्रकार*
विजय नांगरे लोकमत

*उत्कृष्ट पर्यावरण पत्रकारिता*
प्रवीण शिंदे नवराष्ट्र सांगली
संदीप नाझरे मुक्त पत्रकार

*उत्कृष्ट युवा पत्रकार-*
विनायक कदम जनप्रवास तासगाव
प्रसाद पिसाळ जिओ मराठी विटा
गोरख चव्हाण पुढारी क. महांकाळ
सुनील पाटील तरुण भारत आष्टा
प्रशांत नाईक, तरुण भारत मिरज
त्रिरत्न कांबळे लोकमत आँनलाईन

*विशेष सत्कार*
आ. श्री. मानसिंगराव नाईक
वाळवा शिराळा तालुक्यातील पत्रकारांचा प्रतिवर्षी अपघात विमा उपक्रमाबद्दल

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.