प्रतिष्ठा न्यूज

नांदगाव येथे जल जीवन योजने अंतर्गत 70 लाख रुपये पाणी पुरवठा कामाचे भूमिपुजन

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील नांदगाव येथील जल जीवन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या 70 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपुजन जिल्हा परिषदेचे माजी सभापती मा.प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दि 2 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले
विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कायम पाठपुरावा केल्यामुळे नांदगाव येथील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे .

तसेच गावातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या 30 लाख रुपयांच्या सी सी रोडच्या कामाचे भुमिपुजन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे – चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील सावळे, गणेशराव उबाळे, माधव ढेपे , केरबा वडवळे, शिवराज जोमेगावकर, तुकाराम जाधव, सरपंच शांताबाई पांचाळ, अनिताबाई जाधव, कामाची भरकडे, केशव पाटील, माजी सरपंच माधव जाधव, प्रल्हाद पाटील भरकडे, ग्रामसेवक पांचाळ, भगवानराव बेटकर, गणपत भरकडे, अवधुत भरकडे, हरी भरकडे, सुमेध गजभारे, आदीसह गावातील व परिसरातील अनेकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भगवान जाधव गुरूजी यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.