प्रतिष्ठा न्यूज

आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत दीपक चव्हाण यांचे 75 देशगीतांचे कार्यक्रम स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने उपस्थितीत पूर्ण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत 75 ठिकाणी देशभक्तीपर गाण्यांच्या कार्यक्रमाचा संकल्प सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेचे ब्रँडअंबेसिडर दीपक चव्हाण आणि टीमने पूर्ण करीत 15 ऑगस्ट रोजी दीनानाथ नाट्यगृहात आपला 75 वा अमृतमहोत्सवी देशगीतांचा कार्यक्रम सादर केला.
4 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत 75 ठिकाणी देशभक्तीपर गाण्यांच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.
यानंतर दीपक चव्हाण, सोनाली केकडे, अर्चना कदम, जयश्री जाधव, अनिस जमादार, सुहास फडतरे यांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात शहरात शाळा, कॉलेज महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी , पोलीस ठाणी आदी ठिकाणी 74 ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करित देशभक्ती जागृत करण्याचे काम केले. या अभियानातील 75 वा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2022 रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. या अमृतमहोत्सवी देशभक्तीपर गाण्यांचा बहारदार कार्यक्रमाची सुरवात रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अजितराव सुर्यवंशी आणि तेजस्विनी सुर्यवंशी, तसेच मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने झाली. यानंतर स्फूर्तीदायी देशगीते सादर करण्यात आली . या कार्यक्रमात मिरज येथील नॅब संचालित अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मेरा कर्मा हे गीत ऑर्केष्ट्रवर सादर करत सर्वांची मने जिंकली. याचबरोबर विटा पारे येथील
रयत संस्थेच्या सुर्यवंशी शाळेतील मुलांनी बहारदार नृत्य सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या उपक्रमास जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, मनपाआयुक्त सुनील पवार , स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने , उपायुक्त राहुल रोकडे , नगरसेवक गजानन मगदूम , यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर जिद्दीने 75 कार्यक्रम पूर्ण करीत देशावरचे आपले प्रेम दीपक चव्हाण आणि मित्रपरिवाराने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी यावेळी दिली. लवकरच भारतीय सीमेवर देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम करण्याची घोषणा दीपक चव्हाण यांनी केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.