प्रतिष्ठा न्यूज

अंजनीत निर्मळ स्थळी 64 व्या जयंतीनिमित्त आर.आर. आबांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सावळज प्रतिनिधी : अंजनी तालुका तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या 64 व्या जयंतीनिमित्त निर्मळ स्थळावर विनम्र अभिवादन करण्यात आले. आज सकाळपासून राज्यभरातून आबा प्रेमींनी समाधीवर फुले वाहून अभिवादन केले. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंजनी येथे निर्मळ स्थळी फुले वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी आबांच्या मातोश्री भागीरथी, पत्नी आमदार सुमन पाटील, कन्या स्मिता, सुप्रिया, मुलगा रोहित, बंधू राजाराम, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, पुतण्या रोहन, राहुल पाटील यासह आबांच्या कुटुंबियांनी दर्शन घेऊन फुले वाहिली.
यावेळी आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, गट विकास अधिकारीअविनाश मोहिते, अनिता सगरे, जि प सदस्य सतीश पवार, अर्जुन पाटील , संजय पाटील, माजी सभापती संभाजी पाटील, संजय जमदाडे, कमल पाटील, मनीषा माळी, जिल्हा नियोजन समिती सदस्य रवींद्र पाटील, बाजार समिती सभापती नवनाथ मस्के, विवेक शेंडगे, राष्ट्रवादीचे तासगाव शहराध्यक्ष गजानन खुजट, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, युवक अध्यक्ष दत्तात्रय हावळे, ताजुद्दीन तांबोळी, दीपक उनउने, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विलास पाटील, माजी चेअरमन अमोल पाटील, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन पतंग बापू माने,आबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब गुरव, पी.एल.कांबळे,प्रकाश पाटील, पंढरपूरचे सागर फुगारे, युवराज पाटील, तुकाराम कुंभार, अमोल शिंदे, हणमंत देसाई, प्रा.एम.बी.पवार, अजित जाधव, अंजनीचे दीपक पाटील, उत्तम पाटील, माणिक सूर्यवंशी, दीपक शिंदे, अमोल पाटील, संतोष पाटील, अरविंद पाटील, किशोर कोडग, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष महेश पवार,दादासाहेब कोळेकर, चंद्रकांत हाक्के, विकास हाक्के, पांडुरंग यमगर, सुरेखा कोळेकर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, नागरिकांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.