प्रतिष्ठा न्यूज

शिराळा येथे जखमी साळींदराला वाचवण्यात यश

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : शिराळा इस्लामपूर रोड येथे रेड गावालगत , रविवारी रात्री गाडीच्या धडकेमध्ये साळींदर प्राणी जखमी झाला होता. यावेळी स्थानिक लोकांकडून माहिती मिळाल्यानुसार, तात्काळ प्लॅनेट अर्थ फाउंडेशन आणि प्रहार संघटना यांच्या वतीने रेस्क्यू करण्यात आले.साळिंदर रेस्कु करताना प्रणव महाजन, अमित माने, बंटी नांगरे, इत्यादी उपस्थित होते. जखमी साळींदराला शिताफतीने पकडून शिराळा वनविभाग ऑफिस येथे नेण्यात आले आणि त्यावर पशुवैद्यकीय विभागाचे अनिल पारधी यांच्यामार्फत प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघातामुळे साळींदराचे पाठीमागचे दोन्ही पाय जखमी आहेत. तसेच त्याला अंतर्गत दुखापत झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे साळींदराला पूर्ण बरे होण्यासाठी वन विभागाने तात्काळ त्याला पुणे रेस्क्यू सेंटर पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे.सदर घटनेवेळी वन विभागाचे हनमंत पाटील , संतोष कदम आणि इतर वन कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.