प्रतिष्ठा न्यूज

पत्र्याच्या चाळीतल्या मनपा शाळेतील वेदांत जाधव NMMS परीक्षेत चमकला

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 (National means cum merit scholarship examination scheme 2021- 22) NMMS मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय महानगरपालिका शाळा क्रमांक 42 संजयनगर सांगलीचा वेदांत दादासाहेब जाधव हा एन. एम. एम. एस. परीक्षेत सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत जिल्ह्यात २४ व्या रँकने तर महापालिका क्षेत्रात २ ऱ्या क्रमांकाने चमकला आहे. यास दरमहा १ हजार याप्रमाणे ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
एन एम एम एस परीक्षा मनुष्यबळ विकास मंत्रालय(MHRD) नवी दिल्ली यांचे वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे २००७-०८ पासून घेत आहे. एन एम एम एस परीक्षा सुरू झाल्यापासून प्रथमच महानगरपालिकेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला आहे.
सदर विद्यार्थ्यास राज्यस्तरीय नवोपक्रम पुरस्कार प्राप्त शिक्षक शंकर महावीर ढेरे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुमन टोणपे, श्वेता कोळी, पूजा पत्की, वैशाली जाधव यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, उपमहापौर उमेश पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, स्थानिक नगरसेविका कांचनताई कांबळे, नगरसेविका शुभांगीताई साळुंखे, नगरसेवक मनोज सरगर, प्रशासन अधिकारी गीता शेंडगे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे, लेखापाल गजानन बुचडे, तात्यासाहेब सौंदत्ते, केंद्र समन्वयक उज्वला पाटील, धनश्री भाले, सर्व केंद्र समन्वयक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
दरम्यान, वेदांत जाधव गुणवत्ता यादीत आल्याबद्दल संजयनगर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.