प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची… दलित महासंघाचें पालिकेला निवेदन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगांव शहर नगर रचना आराखडा जुना असून त्यात वेळेनुसार बदल होणे गरजेचे होते.तत्कालीन लोकसेवक व प्रशासक यांनी त्यामध्ये काही बदल केलेला नाही.त्यामुळे तासगांव शहरातील रस्त्यांची रचना आजही अडचणीची दिसून येत आहे. त्यातच शहरातील अंतर्गत रस्त्यांची ठेकेदारांनी केलेली कामे निकृष्ठ दर्जाची असल्याने रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य उभे आहे.विटा नाका ते शिवतीर्थ चौक या भागात रस्त्यावर पडलेले खड्डे हा त्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे.तसेच रस्त्यावर बसणारें फळविक्रेते,भाजीविक्रेते व इतर अनेक दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे रस्त्यांवरून चालत जाणे अवघड झाले आहे.सद्या पावसाळयाचे दिवस आहेत,शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत,कॉलेजला जात असताना वाहतूकीच्या गाड्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पाणी अंगावरती पडते.त्यामुळे त्यांचे शालेय युनिफॉर्म खराब होतात.याशिवाय गेली २० वर्षे तासगांव शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे.यासाठी रखडलेला रिंगरोडचे काम पूर्ण करून वाहतूक कोंडी फोडन्यात यावी.अशा विविध अडचणी शहरात असताना प्रशासकीय यंत्रणा ढिम्म दिसून येत आहे.यावर नगरपालिका प्रशासनाने योग्य ती भूमिका घेवून कार्यवाही करावी,अन्यथा पुढील ८ दिवसात दलित महासंघाच्यावतीने तासगांव बसस्थानक चौकातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेवून प्रशासनाचा निषेध करू यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन आज दलित महासंघाचें जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी पालिका प्रशासक मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना दिले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.