प्रतिष्ठा न्यूज

तासगावात डॉक्टरांच्या जिंदादिलीचा जागर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:एक जुलै डॉक्टर्स डे चे औचित्य साधून डॉक्टर डे च्या पूर्वसंध्येला “तासगाव जिंदादिल डॉक्टर्स”आयोजित व लाइफकेअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल प्रायोजित “हुंकार” या डॉक्टरांच्या विविध कलागुणांचा व चित्रकला प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास तासगाव व तालुक्यातील सर्वच डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यामध्ये डॉ.वैशाली शेंडगे यांनी ‘इंगा ‘ ही ग्रामीण कथा सादर केली,तर डॉ.दानेश पोतदार यांनी विविध वाद्यासह सुंदर बासरी वादन केले.डॉ. स्नेहल काळे,ऋजुता शेंडगे,ध्रुवी पाटील यांनी नृत्य सादर केले.डॉ.मनीषा माळी,डॉ.रवींद्र काळे, डॉ.संजय देवकुळे यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. डॉ.संतोष पाटील,डॉ.ज्ञानेश्वर शिवणकर,डॉ.संदीप पवार,डॉ.राहुल माळी,डॉ.सौ शितल पवार,डॉ.मिलिंद जाधव,डॉ.जहीर नदाफ,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.हर्षद माळी,डॉ.सुरज पोतदार,सोहम पाटील,अनिश काळे, आयुष काळे यांनी चित्रपट गीते व विविध कलाप्रकार सादर केले.
यावेळी डॉ.महेश ढाणे,डॉ.मधुलिका राऊत,डॉ.स्नेहल काळे,डॉ.रेखा पाटील,डॉ.मनीषा माळी,डॉ.दानेश पोतदार इ.डॉक्टरनी काढलेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सौ.भारती पाटील व विजय माने पाटील यांनी केले तर स्वागत प्रास्ताविक डॉ.ज्ञानेश्वर शिवणकर यांनी केले आभार डॉ.वैशाली शेंडगे यांनी मानले.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.विजय सावंत,डॉ अमोल सोनटक्के,डॉ गजानन पाटील,डॉ.प्रमोद शेंडगे,डॉ. रोहित सूर्यवंशी,डॉ.शेळके इत्यादी तालुक्यातील डॉक्टर बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.