प्रतिष्ठा न्यूज

शासनाने जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून मैत्रेय ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत : नितीनराजे शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या स्टेशन चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्या जवळ मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशन संस्थेच्या सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी गुंतविलेले पैसे परत मिळावीत या मागणी साठी लाक्षणिक ठिय्या  आंदोलन करण्यात आले होते*
*या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन माजी आम.नितीन राजे शिंदे,व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास  पाठिंबा देऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले*.

*या प्रसंगी माजी आम. नितीनराजे शिंदे म्हणाले,मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता या संस्थेच्या लाखो ग्राहकांनी*
*2600 हजार कोटी रुपयांच्या ठेवी काहीतरी नफा होईल या उद्देशाने जमा केल्या होत्या.पण या संस्थेवर झालेल्या* *गैरकारभाराच्या आरोपामुळे महाराष्ट्र शासनाने संस्थेची 8 हजार कोटीची मालमत्ता कायदेशीर रित्या जप्त केली. ठेवीदारांची गुंतवणूक या मालमत्तेत असल्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत.आज या ठेवीदारांच्या मुलांच्या लग्नासाठी, घरबांधणीसाठी, आजारपणासाठी,पैशाची अत्यंत गरज असताना देखील त्याची स्वतःची रक्कम त्यांना मिळत नसल्यामुळे या सभासदांच्या मध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने संस्थेची जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून येणाऱ्या रकमेतून ठेवीदारांच्या  ठेवी परत कराव्यात   असे आव्हान आम्ही  शासनाला करू*.
*भाजपाचे अविनाश मोहिते म्हणाल्या, एखादी चांगली चालत असलेल्या संस्थेमध्ये काही विघ्न संतोषी लोकांच्या चुकीच्या कारभारामुळे बदनामी होते.त्याचा परिणाम संस्था बंद पडण्या वर होतो त्याचा आर्थिक फटका,भुर्दंड संस्थेच्या सर्वसामान्य ग्राहकांना होतो.या प्रकरणात या गुंतवणूकदारांची गोळा झालेली सर्व रक्कम शासनाने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये आहे.शासनाने जप्त केलेल्या मालमत्तेची कायदेशीर विक्री करून सर्व सभासदांना त्यांची रक्कम परत दिली जाऊ शकते.शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम द्यावी*
*या प्रसंगी मैत्रेय संस्थेचे श्री
दत्तात्रय शिंगाडे,श्री नंदकुमार गौड, श्री राजेंद्र भोगाळे,सौ चित्र कुष्टे यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार सभासद व भाजपा  नगरसेविका,सौ उर्मिलाताई बेलवलकर,भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या सदस्य, स्मिताताई पवार,महिला मोर्चा उपाध्यक्षा,सौ माधुरीताई वसगडेकर,भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रियानंद कांबळे, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष उदय मुळे, भाजपा आघाडीच्या उपाध्यक्षा भाजपाचे अर्जुन मजले,सुमित शिंगे, आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.