प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे – अभिमन्यू पवार; आढावा बैठकीत आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा. ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात असून सोन्या -चांदीच्या ताटात जेवणाऱ्या विरुद्ध आहे. असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले प्रस्थापितांना घरात बसवून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करणारी मंडळी महापालिकेमध्ये जाणे गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडचा वैचारिक विचार घेऊन परिवर्तनाची नांदी सांगलीतून करावयाची आहे. सर्वसामान्य घरातील बंधू-भगिनी नगरसेवक महापौर झाले पाहिजे. तरच लोक हिताची कामे होतील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महापालिका क्षेत्रातील कामाचा आढावा महानगर अध्यक्ष युवराज शिंदे यांनी मांडला. येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड बूथ अध्यक्ष, सदस्य व पन्नास हजार सभासद नोंदणी करून घेणार असल्याचे युवराज शिंदे यांनी सांगितले. यावेळी दिनेश महाडिक प्रदेश केंद्रीय कमिटी सदस्य,जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष रेखाताई पाटील ,सचिव ललिता घडागे,कार्याध्यक्ष आशा भोसले,मिरज तालुका अध्यक्ष रुक्साना मकरानी,शहर सचिव महेश भंडारे ,उपाध्यक्ष नितीन पवार ,महिला शहर अध्यक्ष भारती पाटील, उपाध्यक्ष सुलोचना पवार ,संघटक विजय लांडगे ,शहर प्रवक्ते पवन कदम, कुपवाड शहर अध्यक्ष संदीप शिंदे, डॉ संजय पाटील ,कादर मुल्ला ,बाळासाहेब पाटील आणि संभाजी ब्रिगेड चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.