प्रतिष्ठा न्यूज

तासगाव रा.स्व.संघाचे पथसंचलन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:राष्ट्रहित आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते.त्याप्रमाणे यावर्षी सुध्दा दसऱ्याचे औचित्य साधून शस्त्रपूजन पथसंचलन व बौद्धिक अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार पथसंचलनाची गणपती मंदिर येथून सुरुवात झाली, आणि त्याची सांगता चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर येथे झाली. वाद्यांच्या गजरात पूर्ण गणवेशधारी दीडशे स्वयंसेवकांनी स्वयम् शिस्तीचे दर्शन घडवले.शहरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून,फटाके वाजवून संचलनाचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते जिल्हा कार्यवाह नीतीन देशमाने हे उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध किराणा व्यापारी विजय राव महाजन उपस्थित होते.कार्यक्रम स्थळी  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.