प्रतिष्ठा न्यूज

कांबळे कुटूंबियांना पोरकं होऊ देणार नाही : खासदार- प्रतापराव पाटील चिखलीकर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील कापशी बु. येथील माजी सरपंच तसेच दलित चळवळीतील कार्यकर्ते बुद्धवाशी हौसाजी रामजी कांबळे यांचे दि.8 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले असल्याने जिल्ह्याचे खासदार- प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कापशी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कांबळे कुटूंबियांचे सांत्वन करून त्यांना आधार देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मी आपल्या सोबत आहे आपणास पोरक होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.
तसेच खा- प्रतापराव पाटील यांनी येथून जवळच असलेल्या डोलारा येथील कै.विजय शिंदे यांच्याही कुटूंबियांचे निवासस्थानी भेट देऊन सांत्वन करून धीर दिला.
यावेळी बालाजी पाटील मारतळेकर, गणेशराव पाटील सावळे, भगवान राठोड, सुभाष गायकवाड, बाबूराव पाटील वडवळे, गणेशराव उबाळे, रावसाहेब पाटील, केरबा पाटील, गावातील नागरिक व कुटुंबातील सर्व उपस्थित होते.
तसेच डोलारा येथे रामराव पाटील शिंदे, गणेशराव सावळे, सुभाष गायकवाड, नरेन्द्र गायकवाड, सुमेध गजभारे, सुभाष शिंदे, मारोतराव बेटकर व डोलारा येथील गावकरी उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.