प्रतिष्ठा न्यूज

माजी मुख्यमंत्री- अशोक चव्हाण यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर निवड- मानले पक्ष श्रेष्ठीचे आभार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- काँग्रेस पक्षाच्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्किंग कमिटीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली.
काँग्रेसचे अध्यक्ष- मा. खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी मा. अशोक चव्हाण यांची निवड केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, अविनाश पांडे व पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक यांची निवड या समिती मध्ये करण्यात आली. वर्किंग कमिटी हि काँग्रेसची पक्षाचे सर्वोच्च निर्णय घेणारे समिती आहे. यामध्ये देशभरातून 39 जणांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री-अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देतांना म्हणाले की मला काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी काँग्रेसचे अध्यक्ष- मा.खा.मल्लिकार्जूनजी खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा- मा.खा. सोनियाजी गांधी, देशाचे आशास्थान- मा.खा.राहुलजी गांधी आणि पक्षाचे महासचिव मा.खा.के.सी.वेणुगोपालजी यांचे मनःपूर्वक आभारी आहे अशी प्रतिक्रिया दिली. व पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकतेने व परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस कार्यसमितीचा सदस्य म्हणून देखील मी पक्षश्रेष्ठींचा विश्वास पूर्णत्वास नेऊन सार्थ ठरविणार आहे असेही ते म्हणाले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.