प्रतिष्ठा न्यूज

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवाचन स्पर्धेचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवाचन स्पर्धेचे आज उद्घाटन झाले. सांगली शाखेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन, रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष सी.ए. सलील लिमये, नाट्य परिषद नियमक मंडळ सदस्य चंद्रकांत धामणीकर आणि परीक्षक यांच्या हस्ते नटराज पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्वागत व प्रास्ताविक मुकुंद पटवर्धन यांनी केले. परीक्षकांचा परिचय भालचंद्र चितळे यांनी करून दिला . मनोगत व्यक्त करताना रोटरी अध्यक्ष यांनी रोटरीच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. ब्लड डोनेशन आणि स्कीन बॅंकेविषयी माहिती उपस्थितांना दिली, या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी रोटरी आणि नाट्य परिषदेच्या वतीने घेण्यात येईल असे जाहीर केले. सर्व स्पर्धक संघांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे सुत्र संचालन सौ. अंजली भिडे यांनी केले. पहिल्या सत्रात सादर झालेल्या संस्था आणि संहिता पुढीलप्रमाणे:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिंतामणी नगर कादंबरी “कोसला”, अभिरुची कोल्हापूर कथा “फाळणी” , अल्केश निर्मित सांगली एकांकिका “दोन ध्रुवांवर दोघे आपण”, ललित कला व नाट्य तंत्र शिक्षण महाविद्यालय शांतिनिकेतन सांगली एकांकिका “कॉल गर्ल”, उमा सारंग सांगली एकांकिका “आधी अधुरे”, ब्राह्मण सभा सांगली ऐतिहासिक कादंबरी “शिवपुत्र संभाजी”, साज फाउंडेशन सांगली एकांकिका “फ्रेंडशिप”, वाणी कौशल्य सांगली हिमांशू स्मार्त यांचा ललित लेख”, नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट सांगली एकांकिका “सर मी नॉर्मल आहे का ?”, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूर एकांकिका “खास आपल्यासाठी”, सत्र दुसरे पुढील प्रमाणे :- सौ सुजाता पटवर्धन आणि कलाकार एकांकिका “योगायोग”, परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर कथा “मव उठलय”, सौ उर्मिला भुर्के आणि कलाकार ललित लेख “ट्रिप”, सांगली (जिल्हा) नगर वाचनालय सांगली प्रवासवर्णन “दर्शन मात्रे”, सौ. मुग्धा उदगावकर आणि कलाकार कथा वाचन, नटराज फाउंडेशन सांगली एकांकिका “द्रौपदी”, राणा प्रताप कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ कुपवाड सांगली नाट्यसंहिता वाचन, संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर एकांकिका ऐसी लागी लगन अशा एकूण १८ संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षण सौ. सुप्रिया उकिडवे आणि यशवंत कुलकर्णी यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सनित कुलकर्णी, भालचंद्र चितळे,शशांक लिमये, सौ. रागिणी चितळे, सौ. मानसी कुलकर्णी, शिवराज सुपेकर, अकबर जमादार यांनी सहकार्य केले. सर्व स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ सांगली आणि नाट्य परिषद सांगली शाखेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजता रोटरी क्लब ऑफ सांगली च्या हॉल मध्ये रोटरीचे ३१७० चे प्रांतपाल मा. नासिर बोर्सदवाला यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती नाट्य परिषद सांगली शाखेचे कार्यवाह सनित कुलकर्णी यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.