प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जि.प.शाळा धारजणी येथे मोठ्या उत्साहाने साजरी

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड दि. 13  : भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारजणी येथे 12 जानेवारी हा दिवस युवा दिन तसेच राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ जन्मदिन  उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक श्री एस. के. कदम यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला .तसेच यावेळी उपस्थित असलेले सर्व शिक्षक कर्मचारी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणा स्थान   स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री कदम एस के श्री मोरे श्री मुचेवाड सर श्री उचले सर,श्री मोरे   यु.एस., श्रीमती कोरडे एस.जी. मॅडम आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी यावेळी शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची आकर्षक वेशभूषा सादर केली. त्या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी सहशिक्षक श्री मोरे यु.एस.यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर कार्यावर आधारित भाषण केले. तसेच सहशिक्षक श्री मुचेवाड एस.व्ही.यांनी शिवरायांचे संघटन कौशल्य आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप कदम, श्री उचले जी.बी. श्रीमती कोरडे एस.जी. श्री बुरकुले व्ही.वाय.उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील किंगलवाड हे होते. मु.अ.श्री कदम यांनी जयंती समारोप आपले मनोगत व्यक्त केले.तर यावेळी उपस्थितांचे आभार श्री बुरकुले सर यांनी व्यक्त केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.