प्रतिष्ठा न्यूज

तासगावात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज तासगाव बसस्थानक येथे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्र भर युवासेना प्रमुख श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,रामहरी राऊत शिवसेना व तासगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने वैद्यकीय कक्षा मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामुळे तासगाव शहरातील नागरिकांना सर्व रोगांवर उपचार मोफत होण्यास मदत होईल तसेच एस टी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकावर शिबीर घेऊन आमच्या आरोग्यास देखील एक शिवसेनेचा हातभार लागला अशा भावना व्यक्त केल्या.या शिबिराचे आयोजन वैद्यकीय कक्ष प्रमुख सचिन शेटे यांनी केले व या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून शिवसेना तालुका संघटक दशरथ निकम यांनी काम पाहिले.या शिबिरास शिवसेना नेते तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरात शहर प्रमुख सागर बाबर,तालुका सचिव बासीत मूल्ला,उपशहर प्रमुख पवन चव्हाण,विभाग प्रमुख संदीप रसाळ,युवासेना विभाग प्रमुख संदेश निकम तसेच तासगाव आगार व्यवस्थापक,आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.