प्रतिष्ठा न्यूज

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून जोडधंदा केल्यास आत्महत्या थांबतील: व्हीपीके समूहाचे अध्यक्ष-कवळे गुरुजी

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय असणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी याच प्रयोगातून पुढे गेले असल्याने तेथील शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. आपण शेती करत असताना शेतीला पूरक व्यवसाय आपल्याकडे नसल्यामुळे आपली शेती तोट्यात जाते व याच निराशेतून आपल्याकडे शेतकरी आत्महत्या होत आहेत. असे प्रतिपादन व्हीपीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.मारोतराव कवळे गुरुजी यांनी अध्यक्ष पदावरून बोलतांना शेतकऱ्यांना संबोधित केले आहे. यावेळी विचार मंचावर कापशी गुंफा मठाचे मठाधिपती गुरुवर्य देवगिर महाराज, बालाजी पाटील मारतळेकर, बालाजीराव पांडागळे, गणेश पाटील उबाळे, भास्कर पाटील जोमेगावकर, प्राचार्य संजय ढेपे, सरपंच बालाजी बीचेवाड, डॉ. दत्तात्रय पवार, रमेश सावळे, नागनाथ पांचाळ, निरंजन पाटील, व्यंकट राव पाटील, गणा पाटील, गुलाबराव कुरे, गंगाधर ढेपे,आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना कवळे गुरुजी म्हणाले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायचे असेल तर सहकारी संस्थाचे मोठे जाळे जीवंत ठेवावे लागणार आहे. यासाठीच कै. व्यंकटराव पाटील कवळे (व्हीपीके) पतसंस्थेच्या माध्यमातून ही सहकारी पतसंस्था शेतकऱ्याचे हित करण्याचे काम करण्यासाठी स्थापन करण्यात आली असून शेती ऐवजी शेतीला पुरक व्यवसाया बरोबरच जोडधंद्यांना कर्ज देणे, तसेच सामाजिक दायित्व म्हणून आपत्तीग्रस्ताना आर्थिक मदत व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत योग्य आणि तत्पर सोईसुविधा देण्याचे काम आम्ही करीत आहोत.असे ते म्हणाले.
दि.22 मार्च 2023 रोज बुधवारी नवीन वर्षे “गुडी पाडवा” मुहूर्तावर लोहा तालुक्यातील मारतळा येथे कै. व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्था नुतन शाखेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी- उदयकुमार कुलकर्णी यांनी केले. तर सुत्रसंचालन- सी.एस.कवळे यांनी केले तर सर्वाचे आभार शिवाजी पाटील यांनी मानले. यावेळी उमरा परिसरातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व चेअरमन, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.