प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एप्रिल अखेर सांगलीत सभा होणार : खासदार संजयकाका पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सांगली लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान सांगली येथे एप्रिल अखेर सभा होणार आहे, अशी माहिती उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
संजयकाका पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघात आमच्यासाठी चांगले वातावरण आहे. प्रचारासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल अखेर सांगलीत येणार आहेत. कवलापूर विमानतळ येथे त्यांची सभा होईल. लवकरच तारीख निश्चित केली जाईल. पंतप्रधान येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सभेची तयारी आम्ही सुरू केली आहे. या सभेची उत्सुकता सांगली जिल्ह्यातील मतदारांना सुद्धा आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.