प्रतिष्ठा न्यूज

प्रा. पि. के. खरात यांची भारत सरकारच्या एआयसीटीई च्या उपसंचालक पदी निवड झाल्याबद्दल खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. पि. के. खरात यांची भारत सरकारच्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) च्या उपसंचालक पदी निवड झाली, याबद्दल खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, शंकर मोहिते, प्रवीण चव्हाण उपस्थित होते.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ही एक राष्ट्रीय-स्तरीय सर्वोच्च सल्लागार संस्था आहे, ज्याची स्थापना नोव्हेंबर 1945 मध्ये संस्थांमध्ये तांत्रिक शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि तरतुदींचे सर्वेक्षण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. एकात्मिक आणि समन्वित पद्धतीने भारताच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे. हे उच्च शिक्षण विभागांतर्गत येते आणि सन 1987 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. AICTE देशातील संस्थांमध्ये तांत्रिक शिक्षणाच्या नियोजन आणि विकासाची संपूर्ण काळजी घेते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.