प्रतिष्ठा न्यूज

खाडे इंग्लिश स्कूलची १०० टक्के यशाची परंपरा पाचव्या वर्षीही कायम

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज: येथील मातोश्री तानुबाई दगडु खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज यांनी  १०० टक्के यशाची परंपरा कायम ठेवत शाळेच्या कारकिर्दीत मानाचा तुरा खोवला आहे.  २०२३-२४ शैक्षणिक वर्षाचा १० वी चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये पूर्वा पाटील हिने ९३.९३ टक्के गुण संपादन करत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच शिवा बैलवाड याने ९१.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर अथर्व पाटील याने ९१.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचे हे पाचवे वर्ष असून सलग पाच वर्षे १०० टक्के यशाची परंपरा जपली आहे.
         या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे मुख्याध्यापिका संगीता पाटील व सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. या निकालानंतर सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.