प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री. डॉ. ग. गो जाधव महाविद्यालयात आर्थिक अंदाज पत्रक २०२४ विषयावरील भीती पत्रकाचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री. डॉ. ग. गो जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथील ‘राज्यशास्त्र व अर्थशात्र ‘ विभागामार्फत आयोजन केले व भिती पत्रकाचे प्राचार्य डॉ. टी एम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला या भीतीपत्रकास देशाचे आर्थिक वार्षिक नियोजन, देशाला आर्थिक वार्षिक अंदाजपत्रकाचा तपशिल, वार्षिक आर्थिक आवक व जावक त्यावरील, मान्यवर अर्थतज्ञांची बाजूची व विरोधी मते याची तपशील वार मांडणी केली होती.या अर्थ संकल्पाबाबत सविस्तर माहिती प्रा. डॉ. संदीप पानारी यांनी दिली.
     यावेळी प्रा. डॉ. सागर जाधव व, प्रा. प्रिया पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. सदर उपक्रमास संस्था चेरमन प्रा. सतीश देसाई व सचिव प्रा. डाॅ.विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले स्वागत व प्रास्ताविक प्रा एच एस फरास व आभार प्रा. आदिनाथ कांबळे यांनी मानले
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.