प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात आंतरराष्ट्रीय मित्रता दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी महाविद्यालय , गगनबावडा येथे आंतरराष्ट्रीय मित्रता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक स्थरावर रशिया-युक्रेन , गाझा पट्टी प्रश्नावरून इस्त्राईल-पॅलेस्टाईन असे संघर्ष होत असताना आंतरराष्ट्रीय मित्रता दिन साजरा होणे याला अनन्य साधारण महत्व आहे. या कार्यक्रमात “आपल्या देशात विविध जाती,धर्म,वंश यांमध्ये बंधुभाव, सामंजस्य,सलोखा, देशाची एकता आणि एकात्मता टिकवण्यासाठी मित्रत्वाची संकल्पना अधिक रुजली पाहिजे.” असे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात विद्यार्थी-शिक्षक यांना मित्रत्वाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमास चेअरमन प्रा. सतीश देसाई , सचिव प्रा.डॉ. सौ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. ए. आर. गावकर तर आभार प्रा. ए. एस. कांबळे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.