प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील शामरावनगरच्या समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी पाठपुरावा करणार : कृष्णा आलदर; तज्ज्ञांसह परिसराची पाहणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील शामरावनगर परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी पाठपुरावा करणार आहे. ठोस उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी तज्ज्ञांसह या परिसराची पाहणी करण्यात आली. अशी माहिती आम आदमी पार्टीचे सांगली समन्वयक प्रा.कृष्णा आलदर यांनी दिली.
कृष्णा आलदर म्हणाले, काल रविवारी दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही शामराव नगर भागाला भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. याआधीही आम्ही मे महिन्यात शामराव नगरच्या प्रश्नावर आम आदमी पार्टी तर्फे आयुक्तांना निवेदन दिले होते. पण तेथील परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही. लोकांच्या घरासमोर मोकळ्या प्लॉट मध्ये कमरे एवढे पाणी आहे, तिथे गवत एवढे वाढले आहे की रात्री लोक कसे फिरतात देव जाणे.तेथील प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सिव्हिल इंजिनियर असलेले गेलीस तीस वर्ष त्या क्षेत्रात अनुभवी आणि नावाजलेले डॉ. एन.के पाटील सर आणि मागील 15 वर्ष अनुभवी असलेले डॉ.अमेय काटदरे सर आणि तेथील नागरिक असलेले सातत्याने तेथील प्रश्नावर लिखाण करणारे उच्च शिक्षित सुयोग हावळ आणि तेथील नागरिक आम्ही सर्वांनी मिळून तो परिसर फिरून तेथील माहिती घेतली.शामराव नगरचे प्रामुख्याने दोन भाग शामराव नगर पूर्व आणि पश्चिम असे वर्गीकरन करून तेथील प्रश्न सोडवावे लागतील.शामराव नगर पूर्व असलेला भाग त्याचे सांडपाणी अंकली येथील नाल्यात सोडता येईल जाईल.शामराव नगर पश्चिम भागातील पाणी हरिपूर रोड वरील नाल्यात सोडण्याचे नियोजन करावे लागेल.तसेच या भागाचा टाटा कंपनी सारख्या नावाजलेल्या कंपनी कडून नाल्याचे पाणी आणि सांडपाणी नियोजन कसे करावे यासाठी पूर्ण सर्वे करून प्रश्न सोडवावे लागेल नाहीतर तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखे आणि मागे तसे पुढे चालू राहील.तेथे फिरताना बघितले की काही ठिकाणी रस्ते एवढे खराब आहेत की लोक कसे जातात हे बघण्यासाठी राजकारणी लोकांनी तेथे यावे. जिथे रस्ते आहेत त्या ठिकाणी रस्ते भरिवर भर टाकून एवढे उंच आहेत की घरे खाली गेली.मुळात रस्ते आणि इतर सर्व कामे नियमानुसार आणि लोकासाठी व्हायला हवीत ना की ठेकेदाराची घरे भरण्यासाठी. आम्ही लवकरच वरील तज्ञ लोकांच्या सहभागातून आणि मार्गदर्शनातून ड्राफ्ट मसुदा तयार करून आयुक्ताची भेट घेऊन हा प्रश्न मुळातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.